
सोशल डिस्टन्सिंग या शब्दाचा वास दोन हजार वर्षांपासून आहे. जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून सामाजिक अंतर राखले जाते. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग या शब्द प्रयोगाचा वापर केला जायचा. संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली आणि समाजातील सोशल डिस्टन्सिंगच्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्शनची गरज लॉकडाऊनच्या काळात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द असून तो वापरावा, असे भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पत्र लिहून पंतप्राधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
याविषयावर आलेले मत स्पष्ट करताना गणेश देवी यांनी लिहिलंय, जगभरच्या अनेक समाज शास्त्रज्ञानी ’सोशल डिस्टन्सिंग’बद्दल आक्षेप घेतल्यानंतर आता डब्ल्यूएचओनेही 20 मार्चपासून हा शब्द वापरणे बंद केले आणि सोशल कनेक्टनेस विथ फिजिकल डिस्टन्सिंग या नवीन शब्द प्रयोगाला सुरुवात केली.

























































