लंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन

207

सामना ऑनलाईन लंडन

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केलं जात आहे. तसेच साता समुद्रापार लंडनमध्ये देखील राजे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या बाप्पाचे देखील विसर्जन करण्यात आले. लंडनमध्ये 2013 साली सागर कुलकर्णी यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही मंडळाने गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा केली होती. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजा करून अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले. या वेळी लंडनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसोबतच तेथील स्थानीकही मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

आपली प्रतिक्रिया द्या