VIDEO: साताऱ्यात गणेश विसर्जनाला सुरुवात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘सम्राट’ निघाला

146

सामना ऑनलाईन । सातारा

सातारा शहरामध्ये गणेश मंडळांच्या बाप्पांची विसर्जणाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रतापसिंह फार्म येथे प्रशासनाच्या वतीने खोदण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जन केले जात आहे. मंडळाचे गणपती क्रेनच्या साहाय्याने गणपती बाप्पांना ट्रॉली वरून उचलून लाईफ गार्डच्या साहाय्याने कृत्रिम तळ्यात विसर्जन केले जाणार असून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाची मिरवणूक जल्लोषात सुरु झाली आहे. शहरातील खण आळीतील सम्राट महागणपतीचे  यंदाचे 55 वे वर्ष आहे. महागणपती म्हणून ख्याती असलेल्या विसर्जणासाठी मंडळातील महिला कार्यकर्त्या हाताने ट्रॉली ओढत आहेेत. गुलाल व डॉल्बीला फाटा देत महागणपती सम्राट मंडळाची मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात सुरु झाली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावर्षी देखील कायम ठेवला आहे.

काही दिवसापुर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या मालकीच्या मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन करा असे आवाहन सातारकरांना केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने शहरातील तळ्यांवर घातलेल्या बंदी मुळे कायदा सुव्यवस्था बिघडु नये यासाठी सातारकरांनी तळ्यात गणपती विसर्जन न करता तळ्या शेजारील कृत्रीम कुंडात गणपती विसर्जन करणे पसंद केले आहे

आपली प्रतिक्रिया द्या