
पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी आकर्षक मूर्ती आणि थीम्ससह सजावट केली आहे. यातच अनेक ठिकाणी बापाच्या आगमन मिरवणुकीत तरुणांचा उत्साह दिसून आला. दहा दिवस चालणारा हा उत्सव पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवं रंग देईल.
सर्व फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे