
(राहाता) नगर मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंपरी येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ दरोड्याच्या इराद्याने उभे असणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून शस्त्र साहित्यासह एक चारचाकी वाहन असा पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सर्व आरोपी हे शिर्डी परिसरातील असून आणखी एकाचा शोध पोलीस घेत आहेत.
नमुद सुचना प्रमाणे पथक शिर्डी, राहाता व लोणी परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिर्डी नगर रोडवर, निर्मळपिंप्री येथे 5 ते 6 इसम पांढरे रंगाचे सुमो गाडीसह दरोडा घालण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ‘ठिकाणी जावुन “खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर संशयीत इसम पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन पाच (5) इसमांना ताब्यात घेतले व एक (1) संशयीत इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला आहे.
ताब्यात घेतलेल्या त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे, अजय भोसले (25), रा. साई निर्माण कॉलेज जवळ, कडबा, शिर्डी, ता. राहाता, ऋतुंजय ऊर्फ अमोल कुंदे (19), रा. एकरुखे, ता. राहाता, योगेश कांबळे (19), रा. बाजारतळ, कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता, साईराम गुडे (23), रा. पिंपळवाडी रोड साईश कॉर्नर, पांडुरंग नगर, शिर्डी, ता. राहाता, एक अल्पवयीन मुलगा असे असल्याचे सांगितले. पळुन गेलेल्या इसमाचे नाव सतिष खरात, रा. शिर्डी, ता. राहाता असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता झडतीमध्ये एक लोखंडी कोयता, एक चाकु, एकु स्क्रुड्रायव्हर, मिरचीपुड व एक पांढरे रंगाची सुमो गाडी असा एकुण 5,00,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असून नमूद आरोपी विरुध्द लोणी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर, स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
























































