धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थिनीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार

1237
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशमध्ये एका एमबीएच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. तसेच तिला जबर मारहाण करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये 13 फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनी मेरठहून बसमधून घरी जात होती. रस्त्यातच बस खराब झाल्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याए काही विद्यार्थ्यांनी तिचे अपहरण केले. नंतर बुलंदशहर भागात नेऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार केले. या दरम्यान नराधमांनी तिला जबर मारहाण केली. खूप उशीर झाला तरी मुलगी घरी नाही आली म्हणून पीडित तरुणीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती बुलंदशहरमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला जवळच्या इस्पितळात दाखल केले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी विद्यार्थिनीच्याच ओळखीचे होते अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या