पोलादपुरात शिवसैनिकाची हत्या, मारेकरी फरार

1474
murder-knife

राजकीय वैमनस्यातून पोलादपूरमध्ये शिवसैनिकाची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. गणपत मांढरे असे मृत शिवसैनिकांचे नाव असून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर चौथा आरोपी फरार आहे. तालुक्यातील माटवण गावात संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खुलेआम हे हत्याकांड झाले.

गणपत मांढरे आणि त्यांचा मुलगा यांच्यासोबत गावात काही जणांचे राजकीय वैमनस्य होते. हत्या प्रकरणातील आरोपी शेतकरी-कामगार पक्षातील आहेत. या आरोपींनी भाडोत्री गुंडांच्या मदतीने मांढरे यांच्यावर हल्ला चढवला. मांढरे हे त्यांच्या मोटरसायकलवरून कामानिमित्त बाहेर जात होते. त्यावेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गणपत मांढरे यांचा सख्खा भाऊ सखाराम मांढरे यालादेखील हत्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने विठ्ठल म्हस्के यांच्यासह पोलिसांना आत्मसमर्पण केले. या दोघांच्या माहितीवरून पोलिसांनी विकास म्हस्के संकेत मस्के विलास गोगावले, नाना मांढरे आणि नाना म्हस्के यांना अटक केली आहे

आपली प्रतिक्रिया द्या