
दीड दिवस पूजनाच्या गणेशमूर्तींचे बुधवारी विसर्जन झाले. भाविकांनी गणेशाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी प्रार्थना केली. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवस लवकर शनिवार 4 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे.
पुढील 11 वर्षांच्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
शनिवार 4 सप्टेंबर 2027, बुधवार 23 ऑगस्ट 2028, मंगळवार 11 सप्टेंबर 2029, रविवार 1 सप्टेंबर 2030, शनिवार 20 सप्टेंबर 2031, बुधवार 8 सप्टेंबर 2032, रविवार 28 ऑगस्ट 2033, शनिवार 16 सप्टेंबर 2034, बुधवार 5 सप्टेंबर 2035, रविवार 24 ऑगस्ट 2036, शनिवार 12 सप्टेंबर 2037 या दिवशी गणेश चतुर्थी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.



























































