गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेकीत एक महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौतमी पाटील हिच्या नगर येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान दगडफेक झाल्यामुळे वातावरण काही काळ तंग झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

नगरच्या नागापूर येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटील हिने दिला आहे. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटील हिने जाहीर केली आहे.

गौतमीच्या कार्यक्रमाला महिलादेखील उपस्थित होत्या. दरम्यान हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आटोपला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे. नवगारापूरमधील कार्यक्रम रद्द करत गौतमी पाटील म्हणाली की, मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते. माझ्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही. त्यामुळे गोंधळ होत असतो. आताही तेच झालं. त्यामुळे मी लगेचच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की, बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करत आणि खरचं करेन, असा इशारा गौतमी पाटील हिने दिला आहे.