
जीबीएससदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
या जीबीएस संशयित रुग्णाचे, तसेच त्याने प्यायलेल्या पाण्याचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती समितीची मंगळवारी बैठक पार पडली. यात आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय रुग्णालयात काही बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत.