नव्या वर्षात जीडीपी 5 टक्क्यांवरही जाणार नाही, अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ हंके यांनी वाजवली धोक्याची घंटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2025 सालापर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱया हिंदुस्थानच्या वाटचालीबाबत अमेरिकेचे ख्यातनाम अर्थशास्त्र्ाज्ञ स्टीव्ह हंके यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्या काही तिमाहीत हिंदुस्थानच्या विकास दरात (जीडीपी) लक्षणीय घसरण झाली. ते पाहता नवीन वर्षात हिंदुस्थानला हा दर 5 टक्क्यांवर नेणेही फार कठीण जाईल असे भाकीत त्यांनी केले आहे.

कर्जपुरवठा गोठवल्याचाच हा परिणाम आहे व ही चक्रीय समस्या आहे असे हंके यांनी नमूद केले. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. ते सध्या जॉन हाफकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये ‘ऍप्लायड इकॉनॉमिक्स’ शिकवतात. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानात कर्जात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली, परंतु आजच्या घडीला बुडीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतŠ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात वाढ झाली आहे.

मोदी सरकारला काही पडलेले नाही!
सहा वर्षांत पहिल्यांदा सप्टेंबरच्या तिमाहीत विकास दर 4.5 टक्क्यांवर घसरला आहे. अशा स्थितीत महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अपयशी ठरलेय. या सरकारला आवश्यक त्या आर्थिक सुधारणा करण्यात काहीच रस नाही अशी टिप्पणी हंके यांनी या वेळी केली.

मोदी सरकारचे जातीधर्माकडे लक्ष
अर्थव्यवस्थेचा विचार करण्याऐवजी मोदी सरकार धर्म आणि जाती यांसारख्या अस्थिरता निर्माण करणाऱया तसेच हिंसक विषयांकडे लक्ष देत आहे. हे एक धोकादायक ‘कॉकटेल’ आहे. मोदी सरकारच्या कार्यकालात ‘जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही’चे ‘सर्वात मोठय़ा पोलीस स्टेट’मध्ये रूपांतर होत असल्याचे अनेकांना वाटतेय, असेही मत हंके यांनी व्यक्त केले.