PoK वरील कारवाईस सज्ज, लष्करप्रमुखांचे मोठे विधान

2077

जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल केल्यापासून पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात विखारी प्रचार करत आहे. याच दरम्यान हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानने बेकायदेशीररित्या कब्जा केलेल्या PoK बाबत मोठे विधान केले आहे. लष्कर PoK मध्ये कारवाई करून हिंदुस्थानमध्ये समाविष्ट करण्यासाठी तयार असून फक्त सरकारच्या ठाम निर्देशांचा उशिर आहे, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे. जनरल रावत यांच्या ठाम विधानामुळे पाकिस्तानची तंतरली आहे.

राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी पीओकेसंदर्भात एक विधान केले होते. याबाबत जनरल बिपिन रावत यांना विचारण्यात आले असता त्यांनी सरकारला निर्णय घ्यायचा आहे असे उत्तर दिले. अन्य संस्थांना सरकार सांगेल तशी तयारी करावी लागले. परंतु लष्कर तर कोणत्याही कारवाईसाठी नेहमीच तयार असते, असे ते म्हणाले.

PoK बाबत सरकारने केलेल्या वक्तव्याबाबत आपण खूश असल्याचेही जनरल रावत म्हणाले. याबाबत सरकारने निर्णय घेतल्यास आणि तसे आदेश आल्यास आम्ही तयारच आहोत, असे रावत म्हणाले. यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला होता. पाकव्याप्त काश्मीरबाबत यापुढे पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या