
जनरेशन झेड म्हणजे 1997 ते 2012 या काळात जन्मलेली मुले. त्यांना जेन्झी असेही म्हणतात. या पिढीतील मुलेमुली सीरिअस नसतात. ते कामाचा लोड घेत नाहीत, वगैरे बोलले जाते. पण यातील सगळेच खरे आहे असे नाही. खरं तर ‘जेन्झी’ एकदम स्मार्ट आहेत. लहान वयात ते मोठी झेप घेतात.
अलीकडेच एका सर्व्हेनुसार, वयाच्या पंचविशीतच ही मुले स्वतःचे घर घ्यायचा विचार करत आहेत. 25 वर्षांपेक्षा कमी वयाची 32 टक्के मुले घर खरेदी करत आहेत. एका सर्व्हेनुसार, युवकांमध्ये घर खरेदी करण्याची क्रेझ दिसून येत आहे. देशामध्ये विक्री होणारी 74 टक्के घरे ही 35 पेक्षा कमी वयाचे तरुण खरेदी करत आहेत. यातील 32 टक्के खरेदीदार 25 वर्षांचे आहेत. ते आपल्या कमाईचा 50 टक्के भाग हा ईएमआय म्हणून भरायला तयार आहेत.





















































