गेवराईत काळ्या बाजारातील धान्य जप्त केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई शहरातील पांढरवाडी रोडवरील राजवीर पंपाच्या पाठीमागे एका गोदामात धान्याचा साठा करण्यात आला होता. 450 पोते गहू व 190 पोते तांदळाचे आढळून आले आहे. सदरील धान्य हे काळ्या बाजारातील असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे गेवराई शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शासन आटोकाट प्रयत्न करत असताना गरिबांच्या तोंडात अन्नाचे दोन घास पोहोचावेत म्हणून शासन विविध योजना राबवत आहे, मात्र काही काळाबाजारी गरिबांच्या तोंडातला घास काढून स्वतःचा खिसा भरत आहेत.

तालुक्यामध्ये गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार करणारे एक मोठे रॅकेट आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना पांढरवाडी रस्तावर एका गोदामामध्ये धान्याचा साठा केलेला असल्याची माहिती मिळाली बुधवारी रात्री अडीच वाजता गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई केल्याचे समजते.