गेवराईत महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील गेवराई ते पाडळसिंगी दरम्यान जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर 2 ऑक्टोबर रोजी मृत महिलेचा सांगाडा सापडला आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 2 ऑक्टोबर रोजी गेवराई पोलीस ठाणे हद्दीत 4 वाजण्याच्या सुमारास रांजणी येथील ग्रामस्थांचा पोलिसांना फोन आला. मौजे रांजणी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 शेजारी गेवराई ते पाडळसिंगी जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत नाल्यामध्ये एका महिलेचा सांगाडा आढळला आहे. त्यानुसार गेवराई चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पो. कॉ. खटाणे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

हा मृतदेह शवविछेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख अजून पटलेली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.