मुसळधार पावसाने हाहाकार ऊस कापूस, बाजरीचे पिक झोपले

गेवराई तालुक्यात काल रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने राहेरी, गंगावाडी, राजापूर,या गावातील ऊस कापूस आणि बाजरीचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जायकवाडीतून 94 हजार क्‍युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडल्यामुळे गोदाकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेअसून शासनाने गोदाकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .

नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पैठण येथील जायकवाडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडीचे पाणी गोदावरीच्या पात्रात आज सकाळी सोडल्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना पुराचा वेढा बसला आहे .त्यातच काल रात्री मुसळधार पाऊस सर्वत्र तालुक्यात पडल्याने ऊस ,कापूस,बाजरी,या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत . काहींचे घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून . त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर जायकवाडीचे 94 हजार क्युसेक्स पाणी सुटल्यामुळे श्रीक्षेत्र राक्षस भवन व पंचाळेश्वर येथील शनी मंदिर आणि दत्त मंदिर पाण्यात गेलेले आहेत आज रात्री गोदाकाठच्या गावांना या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो तर पाण्याची आवक अजून वाढल्यास काही गावातील संपर्क देखील तुटू शकतो मोठ्याप्रमाणात पिकाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे गोदाकाठच्या बत्तीस गावातील नागरिक सध्या भयभीत झाले आहेत तर शासनाने गोदाकाठचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

आपली प्रतिक्रिया द्या