
कोरोना या विषाणूंवर मात करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार धार्मिक प्रार्थना स्थळांवर भाविकांनी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई केलेली आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गेवराई तालुक्यातील हिरापूर या गावी मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गेवराईचे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, बीट अंमलदार इंगोले यांनी मंगळवारी हिरापूर घाटले गावचे सरपंच अमोल तिपाले यांच्या हस्ते गावाच्या सुरक्षिततेसाठी गेटला कुलूप ठोकण्यात आले, अशी माहिती गेवराई तहसील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी सामनाशी बोलताना दिली.
































































