तलाठ्यास हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले

सामना प्रतिनिधी । गेवराई

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव सज्जाचे तलाठी हरिदास नामदेव काकडे यांना शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शेतजमिनीचे फेरफार ऑनलाइन करुन दिल्याबद्दल काकडे यांनी हजार रुपयाची लाच मागितली होती. ही कारवाई बुधवारी दुपारी लाचलुचपत अधिका-यांनी सापळा रचून गेवराई शहरात केली.

लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन वाघ व त्यांच्या सहका-यानी सरस्वती कॉलनी भागात सापळा रचून तलाठी हरिदास नामदेव काकडे यास रंगेहात पकडले.