छोटा पुढारी घनश्याम दरोडे झाला दहावी उत्तीर्ण

214

सामना प्रतिनिधी । नगर

राज्यामध्ये छोटा पुढारी म्हणून नाव लौकीक मिळालेला धनश्याम दारोडे हा दहावीमध्ये ५२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. जिल्हाधिकारी होण्याची त्याची महत्त्वकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. घनश्यामची मुर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे. त्याने लहान वयातच त्याने वेगवेगळे विषय हाताळून आपली एक वेगळी ओळख राज्यसमोर ठेवली होती. छोटा पुढारी या नावाने तो प्रसिध्द आहे.

दहावीच्या परिक्षेला तो यंदा बसला होता. त्याला ५०० पैकी २८८ गुण त्याला मिळाले आहेत. सर्वांच्या आशिर्वादाने मी उत्तीर्ण झालो असे सांगायला तो विसरला नाही. शाळेत जाताना रस्त्याची अडचण असल्याने अनेक वेळेला पायी जाण्याशीवाय पर्याय नव्हता. घरात अभ्यास करताना वीज गायप होण्याचे प्रकारसुध्दा सातत्याने घडत होते. मध्यतरीच्या काळामध्ये आजारी पडल्यामुळे वेळे वायाही गेला. त्यात नुकसानही झाले. घरचे काम करुन अभ्यास करावा लागायचा. ‘मी येतोय’ या सिनेमाची निर्मीती आणी प्रमोशनमध्ये वेळ गेलाय मात्र माझ्या पाठीशी सर्वांचे अशिर्वाद असल्याने मी उत्तीर्ण झाल्याचे त्याने सांगितले आहे.

घनश्याम याने श्रीगोंदा येथील महाराजा विद्यालयात प्रवेशासाठी तयारीही सुरु केली आहे. आपल्याला पुढे जिल्हाधिकारी व्हायचे अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त करुन आपल्याला कला शाखेची आवड असल्याचे त्याने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या