घंटाळी प्रबोधिनी संस्थेतर्फे विनाशुल्क क्रिकेट प्रशिक्षण वर्ग

घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे यांच्या विद्यमाने ठाण्याचा दादोजी काsंडदेव स्टेडियम येथे सकाळच्या सत्रात ठाणे जिल्हा व मुंबई उपनरातील 12 ते 19 वर्षे वयोटातील मुला- मुलींसाठी विनाशुल्क क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.

बीसीसीआय लेव्हल थ्री कोच, रणजीपटू संदीप दहाड व रणजीपटू मयूर कद्रेकर हे दोघे ही चाचणी प्रक्रिया आणि संपूर्ण प्रशिक्षण वर्गात युवा प्रतिभेला शास्त्र्ाशुद्ध व तज्ञ मार्गदर्शन करतील. आयसीसी लेव्हल वन कोच भरत शर्मा यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊ इच्छणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणीद्वारे 19 आणि 20 जानेवारी 2021 रोजी 3.30 ते 5.30 सायंकाळी दादोजी काsंडदेव स्टेडियम, ठाणे येथे करण्यात येणार आहे. या चाचणीतून निवडलेल्या क्रिकेटपटूंना जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत विनाशुल्क प्रशिक्षण दिले जाईल. तसेच पुढील कालावधीत सशुल्क प्रशिक्षण दिले जाईल. ज्या खेळाडूंची चाचणीद्वारे निवड होणार नाही त्यांना सशुल्क प्रशिक्षण उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शक प्रमुख राज्यस्तरीय क्रिकेटपटू सागर जोशी (9022035397), नम्रता ओवळेकर राणे (9920781700) व रणजीपटू संदीप दहाड (9823224000) यांच्याशी संपर्प साधावा. अथवा विलास सामंत (संपर्प कार्यालय घंटाळी नका, घंटाळी ठाणे) किंवा नम्रता ओवळेकर राणे (दादोजी कोंडदेव स्टेडियम पॅण्टीन ठाणे) येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी माहिती घंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या