
मुंबईतील घाटकोपर खैरानी रोड परिसरात एका गोडाऊनला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग या परिसरातली बाबू गल्लीतील काही गोदामांना लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उसळे आहेत. दरम्यान या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे.

























































