
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या 2750 मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व्ह संपुल (एआरव्हीसी) ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटच्या दुरुस्तीचे काम तर घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे घाटकोपर आणि कुर्लामध्ये 22 आणि 23 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कामामुळे मुंबईत मंगळवार, 22 डिसेंबर सकाळी 10 ते 23 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत अशी 24 तासांसाठी 15 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईकरांनी या कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
घाटकोपर – प्रभाग क्रमांक 123, 124, 126, 127, 128, 130 मधील आनंदगड, शंकरमंदीर, रामनगर, हनुमान मंदीर, राहुलनगर, पैलासनगर, संजय गांधानगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजीनगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी, डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर 2, अमीनाबाई चाळ, कातोडीपाडा, भीम नगर, इंदिरा नगर 1, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशानगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक 2, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
कुर्ला – प्रभाग क्रमांक 156, 158, 159, 160, 161, 164 मधील संघर्षनगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्पेट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायणनगर, साने गुरुजी पंपिंग इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

























































