घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद, परप्रांतीय महिलेची मुजोरी

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद उफाळून आला आहे. एका परप्रांतीय महिलेच्या मुजोरीचा व्हिडीओ समोर आला आहे. हिंदी ही हिंदुस्थानची भाषा आहे. तुम्ही मराठीत नाही तर हिंदीत बोलायचं, अशी मुजोर भाषा बिहारी महिलेने मराठी लोकांशी बोलताना केली. ही महिला घाटकोपर पूर्वेकडील मदन केटरर्समध्ये कामाला आहे. दुकानाबाहेर उभ्या राहिलेल्या मराठी लोकांना हटकताना तिने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि भांडणाला सुरुवात केली. तिच्या मुजोरीविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.