
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकन संघ गुवाहाटीत दाखल झाले असून 22 नोव्हेंबरपासून बरसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याचे हिंदुस्थानचे लक्ष्य आहे. मात्र कर्णधार शुभमन गिलच्या मानेच्या दुखण्यामुळे त्याच्या फिटनेसने संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबत अंतिम निर्णय शुक्रवारी घेतला जाणार आहे.




























































