
मिशनरी शाळे जाणारी मुलं डॉक्टर इंजिनीअर तर होतात परंतु परदेशात गेल्यावर ते बीफ खातात असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. म्हणून मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजे असेही सिंह म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या आपला मतदारसंघ बेगुसरायमध्ये गिरीराज सिंह एका सभेत बोलते होते. सिंह म्हणाले की, “मिशनरी शाळेत जाणारी मुलं नंतर कलेक्टर, डॉक्टर, इंजिनीअर तर बनतात. परंतु जेव्हा ही मुलं परदेशात जातात तेव्हा 10 पैकी 8 ते 9 मुलं बीफ खातात. त्यांच्यावर संस्कार न झाल्याने ते आपला सनातन धर्म विसरून जातात. म्हणून मुलांना लहानपणापासून शाळेत गीतेचे श्लोक आणि हनुमान चालीसा शिकवायला पाहिजे.”
सनातन धर्मामुळे आपली लोकशाही जिवंत असल्याचे सिंह म्हणाले. तसेच आम्हाला कट्टरवादी म्हटले जाते. आमच्या धर्मात कट्टरवादाला स्थान नाही. प्राण्यांना अन्न आणि झाडांना पाणी घातल्यास पुण्य मिळते असे आमच्या धर्मात शिकवले जाते. परंतु ज्या सापाला आम्ही दूध पाजत आहोत तोच आम्हाला डसयला निघाला आहे असेही सिंह म्हणाले.
























































