सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील एक तरुण एका तरुणीला अश्लील मेसेज पाठवत होता. या मेसेजेसला कंटाळून तरुणीने या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समाधान दळवी एका तरुणीला गेल्या 10 दिवसांपासून व्हॉट्सऍपवर अश्लील मेसेज पाठवत होता. शेवटी तरुणीने त्याला बोरिवली स्थानकाबाहेर बोलवले आणि आपल्या मित्रासह त्याची यथेच्छ धुलाई केली. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून पुढी तपास सुरू आहे.





























































