मौजे म्हाळुगे येथे तरूणीची गळफास लावून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील मौजे म्हाळुगे येथील 18 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खेड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे म्हाळुगे येथे अनिता विष्णु होलम या तरुणीचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत सकाळी 11 वाजता आढळून आला.

घरी कोणीही नसल्याची पाहून या युवतीने आपली जीवनयात्रा संपवली. अनीता हिच्या अशा अकाली जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत