प्रेयसीलाही पोटगी मागण्याचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

40

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लग्न केले नाही, पण बरीच वर्षे एकमेकांसोबत राहिले असतील तर पतीला आपल्या या प्रेयसीलाही पोटगी द्यावी लागणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. एखादे जोडपे खूप वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात असतील, तर जोडपे विवाहबद्ध आहे, असे मानले जाईल असे सांगत त्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, असेही दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यात अशा प्रकारची क्यकस्था आहे. दोघेही जर पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम 125 अनुसार प्रेयसीला उदारनिर्काह करण्यासाठी पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो असे दिल्ली कोर्टाने स्पष्ट केले. मात्र स्थानिक कोर्टाने दिलेल्या निर्णयात दखल देण्यास दिल्ली कोर्टाने यावेळी स्पष्ट नकार दिला. स्थानिक कोर्टाने एका प्रकरणात पती-पत्नीसारखे राहणार्‍या एका जोडप्यातील प्रेयसीला दर महिन्याला पाच हजार रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने तो निकाल बरोबरच असल्याचे ठणकावले.

लग्नाचा पुरावा नसला तरीही

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते की, सदर महिला आपली पत्नी नाही. तिच्याकडे माझ्यासोबत लग्नाचा कोणताही पुरावा नाही. मग पोटगी कशी देऊ? मात्र दुसरीकडे महिलेने म्हटले की, आमचा कायदेशीर विवाह झाला नसला तरी आम्ही गेली 20 वर्षे एकत्र राहात होतो. दोघांचेही मतदान ओळखपत्र आणि पत्ता एकच आहे, असे महिलेने सांगितले. मतदान ओळखपत्रावर पतीचे नावसुद्धा असल्याचे महिलेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने लग्नाचा कोणताही पुरावा नसतानाही त्या महिलेला पतीने पोटगी द्यावी असाच निर्णय दिला.

आपली प्रतिक्रिया द्या