नऊ महिन्यांची गरोदर महिला रिंगणात

कोल्हापुरात नऊ महिन्यांची गरोदर महिला निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. अवघडलेल्या अवस्थेतही या महिला उमेदवाराकडून दररोज पायी प्रचार केला जात आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या तिकिटावर गितांजली हवालदार या निवडणूक लढवत आहेत. नऊ महिन्यांची गरोदर माता असूनही प्रभागात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रोजचा चार किलोमीटर त्या पायी प्रवास करतात. गरोदरपणाच्या काळात निवडणुकीची जबाबदारी पेलताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराघरातील माता-भगिनी आपली काळजी घेतात. तब्येतीची काळजी घ्या असाही सल्ला मतदार देतात, असे त्यांनी सांगितले.