कोरोनाला प्रतिबंध करणारी फॅबिफ्लू आता 75 रुपयांत मिळणार

685

देशी औषध कंपनी ग्लेनमार्कने देशातील कोरोनाग्रस्तांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपनीने कोरोनाला प्रतिबंध करणारी आपल्या फॅबिफ्लू गोळीची किंमत २७ टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे या एका गोळीसाठी आता १०३ ऐवजी फक्त ७५ रुपये मोजावे लागणार आहेत. आपल्या देशबांधवांना कमी किमतीत आपली औषधे पुरवून आम्हीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलत आहोत असे कंपनीचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट आलोक मलिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या