
>> डॉ. दीपक सावंत
ऑस्ट्रेलियात लागलेला वणवा, मेलबर्न शहरातील प्रदूषण स्कॉटलॅण्डमधील उसळणाऱया प्रचंड लाटा काय दर्शवतात? या सर्वांचे मूळ क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. खरं तर क्लायमेट चेंज व ग्लोबल वॉर्मिंग या दोन वेगवेगळय़ा टर्म्स आहेत.
शेतकऱयाची कर्जमाफी हा सध्या ज्वलंत विषय आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. महाराष्ट्रातही शेतीवर हजारो संसार अवलंबून आहेत. मात्र ही सर्व शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. कधी संपूर्ण पावसाळा कोरडा जातो तर कधी पाऊस हुलकावणी देऊन जातो, या सर्वाला कारणे शोधताना आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाचा झपाटय़ाने विकास होत आहे. त्यामुळे अनेक उद्योग पुढे येत आहेत आणि त्यातून होणारे कार्बनचे उत्सर्जन, नायट्रस ऑक्साईडचे वाढणारे प्रमाण यामुळे निश्चितच विचार करण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियात लागलेला वणवा, मेलबर्न शहर सर्वात प्रदूषित असल्याची बातमी, स्कॉटलॅण्डमधील उसळणाऱया प्रचंड लाटा काय दर्शवतात? या सर्वांचे मूळ क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. खरं तर क्लायमेट चेंज व ग्लोबल वॉर्मिंग या दोन वेगवेगळय़ा टर्म्स आहेत.
पृथ्वीचे तापमान किती हे 1880 पासून आपण मोजण्यास सुरुवात केली. प्रत्येक क्षणाक्षणाला ते वाढत आहे. साधारणतः सध्या ते 0C वाढले आहे आणि ते वाढतच राहत आहे. या सर्वाचा परिपाक म्हणजे आपण ‘वसुंधरा दिन’ पाळतो. काही काळ दिवे विझवून कार्बन उत्सर्जन आपण थांबवू शकणार नाही. शास्त्र्ााrय दृष्टिकोनातून पाहिले तर CO2 चे प्रमाण 280 PPM वरून ते 400 PPM पर्यंत केले आहे. क्लायमेट चेंज आणणारा मुख्य घटक CO2 आहे. हे सर्वथा मानवनिर्मित आहे. या वाढलेल्या तापमानामुळे होणारे समुद्राचे ऑसिडिफिकेशन, ग्लेशियर्स वितळणे, बायो डायव्हरसिटीत बदल म्हणजेच (जैवविविधतेत बदल), हवामानात टोकाचे बदल, अति उष्णता, अति थंड, अतिवृष्टी असे अनेक बदल आपल्याला दिसतात.
लोकसंख्येचा विचार केला तर 50% – 50% लोकसंख्या विभागली गेली आहे (50% शहरी, 50% ग्रामीण) 2050 साली मात्र 2/3 लोकसंख्या शहरात, 1/3 लोकसंख्या ग्रामीण भागात असे चित्र आपल्याला संपूर्ण देशात पाहायला मिळेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही तितकेच वाढेल. ज्याप्रमाणे समुद्राच्या ऑसिडिफिकेशनचे परिणाम दृश्य स्वरूपात दिसत आहेत. तसेच Extreme Weather याचेही परिणाम हीट वेव्हज् (Heat Waves), दुष्काळ, पूरपरिस्थिती, गारा, वादळे, चक्रीवादळे यांचे परिणाम मानवी आयुष्यावर, आर्थिक परिस्थितीवर, मानवी आरोग्यावर, जमिनीवर, पर्यायाने शेतीवर दिसतात. ही परिस्थिती देशात, जगात व महाराष्ट्रातही आहे. आतापर्यंत मिडल ईस्ट नॉर्थ आफ्रिका, आशिया खंडात तीक्र तापमान पाहायला मिळते. 2016 मध्ये स्पेनमध्ये पश्चिम मध्य युरोपात हीट वेव्ह (Heat Wave) पाहायला मिळाली.
1955 सालापासून 90 टक्के निर्माण झालेली उष्णता ही ग्रीन हाऊस म्हणजेच हरित वायुगृहात ट्रप होत आहे. त्यानंतर ती समुद्रात शोषून जाऊन गेल्या 15 वर्षांत क्लायमेट चेंजचे अनुभव दिसू लागले आहेत. त्याची तीक्रताही वाढत आहे. त्यामुळे बर्फाचे वितळणे, समुद्राचे पाणी ऑसिडिक होणे, जलसृष्टी जलचर यांच्यावर होणारे परिणाम, विशेषतः शिंपल्यावर ऑसिडिफिकेशनचा परिणाम ओयस्टर शिंपले याच्यामध्ये असलेल्या कॅल्शियम कॉर्बोनेटवर दिसून येतो. आर्क्टिक समुद्र हे वाढत्या तापमानाचे उत्तम उदाहरण आहे.
या वाढत्या तापमानामुळे समुद्राचे आरोग्य बिघडले आहे. नवीन संशोधनामुळे समुद्राची पातळी गेल्या 100 वर्षांत तीन इंचांनी वाढली आहे. किनाऱयावर येऊन धडकणाऱया वादळांनी समुद्राच्या किनारपट्टीची धूप मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यातून नवीन संकट म्हणजे ‘मत्स्य दुष्काळ’ या विषयावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. मत्स्य दुष्काळाचे प्रमुख कारण हे समुद्राच्या पाण्याचे ऑसिडिफिकेशन आहे.
ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज यांनी किती हानी झाली याची कुठेही नोंद नाही. परिणामांची दाहकता खूप मोठी आहे. ‘शेतकरी आत्महत्यां’साठी कारणीभूत असलेल्या कारणांमध्ये ‘आर्थिक कारण’ जरी समोर दिसत असले तरी यासाठी अवकाळी पाऊस, समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, अगदी गारपीट यामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि आर्थिक बोज्यामुळे झालेल्या आत्महत्या या आत्महत्यांचा सूक्ष्म अभ्यास होणे आवश्यक आहे. आपण जर खोलात शिरलो तर भौगोलिक परिस्थिती, पिके घेण्याची पद्धती, जमिनीचा खारपणा, प्रमाणापेक्षा अधिक वा अगदीचा उणा पाऊस, खते, बियाणे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सततची पडणारी रोगप्रणाली, कीटकनाशकाची फवारणी पण त्या कीटकालाही सततच्या औषधाला कीटकाच्या जनुकीय संरचनेत, पर्यायाने संसर्गाला औषधाच्या मात्रेला नव्याने तयार झालेली प्रतिकारशक्ती या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर अळय़ा मरत नाहीत. शेतकऱयाचे पीक रोगमुक्त होत नाही. म्हणून दोन-तीन कीटकनाशके मिक्स करून केलेली फवारणी, शेतमजुरांनी फवारणीच्या वेळीस न घेतलेली काळजी, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने केलेल्या फवारणीमुळे Poisoning केसेस, पर्यायाने शेतकऱयाचे मृत्यू (यवतमाळ). हे दुष्ट कालचक्र केवळ शेतकऱयाला ठोक मदत देऊन रोखले जाणार नाही. तात्पुरती मदत होते. त्याचीही आवश्यकता. तरी पण कार्बन उत्सर्जन थांबवण्याचे मॅरोथॉन प्रयत्न आवश्यक आहेत. शेतकऱयाच्या काळय़ा आईच्या पोटातदेखील जगात करोडो टन कार्बन आहे. वनस्पतीच्या किंवा झाडाच्या पानातून Photosynthesis प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा कार्बनडायोक्साईड हा हवेत जाताना जमिनीत शोषला जातो. निर्माण होणाऱया उष्णतेमुळे बाष्पीभवनातून पाण्याचा अंश जमिनीतून कमी होतो. इरिगेटेड जमीन हा अंश कमी होऊ देत नाही. कार्बनचे प्रमाण हवेपेक्षा जास्त जमिनीतच असते. ‘2500 बिलियन टन’ जगाच्या जमिनीत कार्बन आहे असे अनुमान आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किंवा क्लायमेट चेंजमध्ये स्थलांतर हा मोठा विषय आहे. स्थलांतर हे पिण्याच्या पाण्यासाठी असो की रोजगारासाठी, शेतात काही पिकले नाही, खायला काही नाही, भूकबळी होऊ नये किंवा नदीची समुद्राची पाण्याची पातळी वाढू नये. महाराष्ट्रात नव्हे तर जगात ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे स्थलांतर होत आहे. दिल्लीचा प्रदूषणाचा विषय आताच ऐरणीवर आला होता, नव्हे दरवर्षी येतो. यावर तोडगा काहीच नाही. नागपूर, मराठवाडा येथे उष्माघाताचे रुग्ण दिसतात.
ग्लोबल वॉर्मिंगच्या वातावरणाचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असतो. तरी अजून आपण वेस्ट नाईल फिव्हर, यलो फिव्हर, सॅण्डफ्लायच्या अधिक प्रजननामुळे होणारा Leshaminiasis आजार याकडे पाहिलेच नाही. दरवर्षी जगात स्ट्रोकमुळे 3.5 million, कॅन्सरमुळे 1.7 million, हृदयरोगामुळे 2.3 million, दीर्घकालीन फुप्फुस रोगाने 1.4 million, इन्जुरीमुळे 1.7 million, डायरियामुळे 8,46,000, नवजात बालके 9,70,000, मलेरिया 2,59,000, श्वसनरोग 8,46,000 मृत्यू पावतात. आपल्या महाराष्ट्रात जर एक महिन्यात अवकाळी पावसाने 300 मृत्यू होत असतील तर इतर जनुकीय संरचना बदलणारे विषाणू, त्यापासून उद्भवणारे आजार, त्यावरची प्रभावी औषधे, कोणता आजार पुढील तीन महिन्यांत क्लायमेट चेंजमुळे होऊ शकतो.
ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी ‘ग्रेटा थर्नबर्ग’ या तरुणीच्या खांदय़ाला खांदा लावणारे अनेक तयार झाले पाहिजेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यायी इंधन व्यवस्था, Fossile fuel हा पर्याय आणि विकास व पर्यावरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची सांगड पुन्हा नव्याने घालण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. हे शिवधनुष्य घरोघरी उचलून कार्बन उत्सर्जन कमी केले तर सामाजिक, आर्थिक, आरोग्य, प्रगती होईल व 2050 ला येणारा ‘भस्मासुर’ आपोआप गाडला गेला नाही तरी त्याची तीक्रता कमी होईल. महाराष्ट्राला ही आवश्यकता आहे सामूहिक चळवळीची, नेतृत्वाची – ग्रेटा थर्नबर्गसारख्या!
(लेखक राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत)






























































