गोवा भाजपात बंड! माजी मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांनी फडकवले निशाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर पक्षात बंडाची निशाणे फडकू लागली. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री यांच्यासह पाच जणांनी पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर, काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेले जलस्त्राsत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, मगो सोडून भाजपामध्ये आलेले दीपक पाऊसकर यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपाला पक्षांतर्गत बंडाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विश्वजीत राणे आणि बाबुश मोन्सेरात यांना सपत्नीक उमेदवारी जाहिर होताच सांगेमधून भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करणाऱया उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर नाराज झाल्या असून त्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने यावेळच्या निवडणुकीत भाजपासाठी घराणेशाही डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. सावित्री यांच्यासह सांगेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी देखील उमेदवारी नाकारल्या नंतर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.

मांद्रे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि त्यांचे समर्थक दुखावले असून पार्सेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत.

कुंभारजुवे मतदारसंघातून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे.उमेदवारी नाकारल्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटतात यावर भाजपाला किती फटका बसेल याचे उत्तर मिळणार आहे.

यादीत पर्रीकरांच्या मुलाचे नाव नाही!

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर याचे नाव भाजपच्या यादीत नाही. पणजी मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उत्पल यांना उमेदवारी नाकारत विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांनाच भाजपकडून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी 40 जागांपैकी 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री प्रमोद साकंत सांकेलीम तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट देण्याची तयारी आम्ही दर्शकली आहे. त्यांना पणजीऐवजी इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. दुसऱया पर्यायाकर त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

पर्ये मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या यांना उमेदवारी दिली आहे. मागील निकडणुकीत पराभूत झालेले गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तकडकर, दयानंद मांद्रेकर यांना भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू ककळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना मात्र सांगे मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली नाही.

भाजपचे यूज ऍण्ड थ्रो धोरण – केजरीवाल

भाजपने पर्रीकर कुटुंबासोबत यूज ऍण्ड थ्रो धोरण अवलंबले आहे. मी मनोहर पर्रीकरांचा नेहमीच आदर केला आहे. उत्पल पर्रीकरांचे ‘आप’मध्ये स्कागत आहे. त्यांना आम्ही निवडणूक लढकण्यासाठी उमेदवारी देऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सहा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले

विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभुपाऊसकर, जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांच्यासह सहा विद्यमान आमदारांचे भाजपने तिकीट कापले आहे. जाहीर केलेल्या 34 उमेदवारांपैकी 9 जण ख्रिश्चन समाजाचे आहेत, तर तीन जागांवर अनुसूचित जमातीच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

पणजीतून लढण्यावर उत्पल ठाम

गोवा विधानसभेची निवडणूक लढकेन तर फक्त पणजीतूनच. डिचोली किंवा अन्य कोणत्याही जागेवरून लढण्याचा विचार नाही. निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघ हाच एकमेक पर्याय आहे. याबाबत निर्णय काय असेल ते लवकरच जाहीर करेन, असे उत्पल पर्रीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.