गोव्यात कॉँग्रेसची नवी खेळी, विधानसभेचे आठ उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाने निवडणुकीची धुरा दिली आहे. प्रियांका यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. त्यानंतर आता काँग्रेसने थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत इतर पक्षांना चकीत केले आहे.

प्रियांका गांधी यांनी 10 डिसेंबर रोजी गोव्याचा दौरा केला. या दौऱयात त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तसेच स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी पहिली आठ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले सुधीर कानोलकर यांना तिकीट दिल आहे.