गोव्यात खांदेपालट; उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्याकडे नियोजन, कृषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, गोवा

काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शपथ घेतलेल्या चार नव्या मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. नवे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, पुराभिलेख, पुरातत्व, कारखाने आणि बाष्पक खाते सोपवण्यात आली आहेत.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडील कायदा खाते काढून घेऊन त्यांना कौशल्य विकास हे नवे खाते देण्यात आले आहे. राणे यांची आरोग्य, उद्योग आणि महिला आणि बाल कल्याण ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे महसूल, आयटी आणि कामगार आणि रोजगार, फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांच्याकडे जलस्रोत, मच्छीमार आणि लीगल मेट्रोलॉजी. तर मायकल लोबो यांच्याकडे ग्रामीण विकास, कचरा व्यवस्थापन, बंदर आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती सोपवण्यात आली आहेत. माविन गुदींन्हो यांच्याकडे गृह निर्माण खात्याचा अतिरिक्त भार सोपवताना पशू पालन हे खाते काढून घेण्यात आले आहे. नीलेश काब्राल यांच्याकडील विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते काढून घेऊन ते नव्याने मंत्री झालेल्या मायकल लोबो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.