गोव्यातील नागरिकांना दक्ष रहावे, गोव्याच्या राज्यपालांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 मार्च रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंदर्भात देशाला संबोधित करताना 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्वेच्छा संचारबंदी अर्थात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यानी आपल्या घराच्या बालकनीत, दरवाज्यात, दर्शनी भागातील खिडकीत तुम्ही या आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतुक करा असे आवाहन केले आहे.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींचे आवाहन स्वीकारले आहे आणि गोव्यातील जनतेला ’जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानी लोकांना 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच घराच्या बालकनीत, दरवाज्यात, दर्शनी भागातील खिडकीत तुम्ही या आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतुक करा असे आवाहन केले आहे. त्यांनी पालकांना आपल्या मुलांची खास काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.