गो व्वा! आजपासून हॉटेल्स सुरू, पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी

कोरोनामुळे सर्वत्र लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरात राहून पंटाळला आलेल्या गोवेकरांसाठी एक खूशखबर आहे. 22 मार्चपासून बंद असलेली हॉटेल्स उद्या गुरुवार, 2 जुलैपासून सुरू होणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी याबद्दल माहिती दिली.

जवळपास अडीचशे हॉटेल्सनी व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज दिले आहेत. ज्या हॉटेलांची नोंदणी पर्यटन खात्याकडे आहे, त्यांनाच हॉटेल्स सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या