रशियातून पहिले चार्टर विमान शुक्रवारी गोव्यात होणार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान मॉस्को येथून 4 ऑक्टोबरला गोव्यात दाखल होत आहे. 224 पर्यटकांना घेऊन रॉयल फ्लाईट सकाळी 6.30 वाजता दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहे.

ऑक्टोबर 23 पासून एप्रिल अखेरपर्यंत दर दिवशी या एअरलाईनची दोन चार्टर विमाने येणार आहेत. रॉयल फ्लाईटचे गोव्यातील प्रतिनिधी मॅलरॉय डिकॉस्टा यांनी या विमानांबद्दल हमी दिली. या विमानातून येणाऱया पर्यटकांची हाताळणी केपर ट्रॅव्हलर्सद्वारे होणार आहे. रशियन मार्केट या हंगामात चांगल्या सेवेची अपेक्षा करत आहे.