चरस बाळगल्या प्रकरणी प.बंगालच्या तरुणास कळंगुट मध्ये अटक

12

सामना प्रतिनिधी । पणजी

कळंगुट पोलिसांनी शनिवारी सापळा रचून प.बंगालच्या तरुणास 60 हजार रुपयांच्या चरससह अटक केली. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार एलियास कांचन हा 21 वर्षीय तरुण ड्रग्सची विक्री करण्यासाठी कळंगुट पार्किंगकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिस उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पथक साध्या वेषात कळंगुट पार्किंग परिसरात दबा धरून बसले. एलियास तेथे पोचताच पोलिसांनी त्याला घेरुन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चरस आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजरात त्याची किंमत 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एलियास विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री साडे अकरा ते पहाटे 2 दरम्यान करण्यात आली.पोलिस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या