
सामना ऑनलाईन। पणजी
मंगळवार, 23 एप्रिल रोजी लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले दोन महिने चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली.
राज्यातील 11,35,810 मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. उत्तर गोव्यात 5,56,625 तर दक्षिण गोव्यात 5,79,185 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला. आता उमेदवारांना केवळ घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा राहील. राज्यात दोन दिवसांत कोणीही नेते मंडळी आलेली नाहीत. भाजपने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी नेत्यांच्या सभा घेतल्या.




























































