भगवान जगन्नाथ 14 दिवस क्वारंटाईन झाले, 15 दिवसांनी ठीक होऊन नगरभ्रमणाला निघणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील लक्ष्मण बागचे भगवान जगन्नाथ स्वामी मंदिर एका अनोख्या परंपरेमुळे सध्या चर्चेत आहे. प्राचीन परंपरेनुसार जेष्ठ महिन्यातील र्पौर्णिमा महास्नानानंतर भगवान जगन्नाथ स्वामी सर्दीने आजारी पडतात. त्यानंतर त्यांना भक्तांपासून 14 दिवस क्वारंटाईन करीत त्यांच्यावर रेवातील वैद्यांकडून उपचार सुरू केले जातात. आताही भगवान भक्तांपासून विलगीकरणात गेले आहेत. आता त्यांच्यावर सुरू असलेल्या  उपचाराने भगवान 15 दिवसानंतर ठीक होतील आणि नगरभ्रमणाला निघतील. तेव्हा त्यांची शोभायात्रा काढण्यात येईल. ऐन कोरोना महामारीत प्रत्यक्ष भगवान विलगीकरणात जाणार या कल्पनेने भक्तगण उदास झाले आहेत, असे या मंदिराच्या पुजार्‍यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी या कालखंडात भगवान जगन्नाथ आजारी पडतात आणि वैद्याच्या इलाजानंतर बरे होतात असेही रेवातील या मंदिराच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार भगवान जगन्नाथ स्वामी जेष्ठ महिन्यातील र्पौर्णिमा स्नानानंतर दर वर्षी सर्दीने आजारी पडतात. त्यानंतर रेवा शहरातील जेष्ठ वैद्य त्यांच्यावर जडी-बुटीच्या औषधाने उपचार करतात.या काळात भोग अथवा प्रसाद म्हाणून भगवान जगन्नाथाना वैद्यांचे औषधी काढे चढवले जातात. उपचारानंतर भगवान जगन्नाथ आषाढ महिन्यातील अमावस्येला पूर्ण बरे होतात आणि नगरप्रदक्षिणेला निघतात. तोपर्यंत 14 दिवस ते मंदिराच्या कपाटांत विलगीकरणात राहतात अशी परंपरा गेली 150 वर्षे सुरू आहे, अशी माहिती ओडिशातील जगप्रसिद्ध पुरी जगन्नाथ मंदिराच्या पुजार्‍यांनी दिली.

खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांनी किनारपट्टीवर मासे पागायला सुरुवात केली आहे. भरती-ओहोटीच्या वेळेनुसार किनार्‍यावर ही मासेमारी केली जाते. मासेमारी बंदीच्या या काळात वरळी सी लिंकजवळ कोळीबांधवांनी उपजीविकेसाठी असे भरसमुद्रात उतरून जाळे टाकले.