गोखले पुलाच्या मार्गिकेचे काम दिवाळीपर्यंत रखडले

गोखले पुलाची एक बाजू यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाचे काम रखडले आहे. त्याचबरोबर पुलाचे गर्डर बनवण्याचे काम सुरू असलेला कारखाना हरयाणातील अंबाला येथे असून तिथेही अतिवृष्टीमुळे कारखान्यात पाणी शिरले आहे. त्यामुळे गोखले पुलाची एक मार्गिका सप्टेंबर महिन्याऐवजी आता दिवाळीत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने करण्यात आली.