
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाने गुढीपाडव्याची शेतकऱयांना भेट दिली आहे. 1 एप्रिलपासून दूध खरेदीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हैस व गाय दूध खरेदी दरातही वाढ मिळणार आहे.
म्हैस दूध खरेदीदरात 6.0 फॅट व 9.0 एसएनएफसाठी ही वाढ असून, त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर 41.50 पैसे वरून 43.50 पैसे होणार आहे; तसेच गाय दूध दरात 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. त्यामुळे गाय दूध दर 27 वरून 29 रुपये होणार आहे. संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.































































