बीडच्या चातुर्मासात गोकुळाष्टमी; कृष्णजन्मोत्सवाचा अनोखा योग

236

उमरखेड संस्थानचे प. पु. माधवानंद महाराज यांचा चातुर्मास सुरू असलेल्या बीडमध्ये यंदा ही गोकुळाष्टमीचा कृष्णजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्वाभराच्या दरबारात जन्मोत्सव जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांसाठी हा अनोखा योग ठरणार आहे.

प पु माधवानंद महाराजाच्या चातुर्मासाने बीड भक्तिमय झाले आहे, राज्यभरातून शिष्यगण दर्शनासाठी रीघ लावत आहेत, रोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत, बीडचा चातुर्मास भव्यदिव्य होत आहे. महादेवाचे उपासक असणाऱ्या उमरखेड संस्थान विश्वाभराच्या दरबारात यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे कृष्णजन्म भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी दर्शन, आरती, महाप्रसाद, कृष्णजन्मोत्सव, महिलांचा दांडिया, रात्री कीर्तन होणार आहे. कृष्णजन्मोत्सवाचा अनोखा योग चातुर्मास स्थळी पार पडणार आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या