सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा घसरण झाली. 24 कॅरेट सोने 324 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति तोळा 76,584 रुपयांवर पोहोचले तर चांदीच्या भावातसुद्धा आज 514 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव आता प्रति किलो 89 हजार रुपयांपर्यंत खाली आला. 23 ऑक्टोबर रोजी चांदी प्रति किलो 99,151 रुपये किलो होती, तर सोने 79,681 रुपये तोळा होते. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत आता 71 हजार 500 रुपये आहे. काही दिवसांपासून सोन्याच्या दरवाढीला बेक लागला आहे.
























































