
तीन दिवस उसळी घेऊन ऐतिहासिक किंमतीवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावामध्ये मंगळवारी घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किंमती एक टक्क्यांनी कमी झाल्याने सोन्याचा भाव पडला. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये एक तोळा सोन्याचे दर 41,210 आणि एक किलो चांदीचे दर 48,600 रुपयांपर्यंत आला. सोमवारी हाच दर विक्रमी वाढीसह 41,730, तर एक किलो चांदीचे दर 49,430 रुपयांवर पोहोचला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किंती 0.86 टक्क्यांनी अर्थात 39 रुपयांनी कमी झाल्या आणि प्रति बॅरल 4499 रुपयांवर स्थिरावल्या. त्यामुळे हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. तसेच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमतही पडल्यान सोन्या-चांदीच्या भावातही घसरण झाली. सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 420 रुपयांनी आणि चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 830 रुपयांनी पडला.
Gold prices plummet Rs 420 to Rs 41,210 per 10 gram in Delhi; silver falls Rs 830 to Rs 48,600 per kg.
— Press Trust of India (@PTI_News) January 7, 2020
याआधी 2 जानेवारीपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. तीन दिवसांमध्ये सोन्याच्या भावात 1620 रुपयांची, तर चांदीच्या दरात 1850 रुपयांची वाढ झाली होती. अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असल्याने गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.




























































