
सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 603 रुपयांची घसरण होऊन सोने प्रति तोळा 98 हजार 414 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातही 1 हजार 655 रुपयांची घसरण झाल्याने चांदी प्रति किलो 1 लाख 11 हजार 745 रुपये झाली आहे. 23 जुलै रोजी सोन्याचा भाव 1 लाख 533 रुपये होता. तर चांदी 1 लाख 15 हजार 850 रुपये किलो होती.