अवघ्या आठ दिवसांत सोने 3 हजारांनी महागले

सोन्या आणि चांदीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. अवघ्या आठवडाभरात सोने 3 हजार रुपयांनी तर चांदी साडेतीन हजार रुपयांनी महागली आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 2 हजार 388 रुपये झाली आहे. मागील आठवडय़ात सोन्याचा भाव 99 हजार 358 रुपये प्रति तोळा होता. तर चांदी 3 हजार 666 रुपयांनी महाग झाली आहे. चांदी 1 लाख 17 हजार 572 रुपये किलो झाली आहे. मागील आठवडय़ात चांदीचा भाव 1 लाख 13 हजार 906 रुपये होता. सोने अवघ्या आठ महिन्यात 26 हजारांनी महाग झाले आहे.