
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळजवळ आठवडाभर किमती वाढल्यानंतर, आज गुरुवारी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेने जपानसारख्या त्यांच्या अनेक व्यापारी भागीदारांशी व्यापार करार केल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे. (23 जुलै) 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,02,330 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचली. गुरुवारी (24 जुलै) किंमत 1,360 रुपयांनी कमी होऊन 1,00,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
गुरुवारी हिंदुस्थानातील सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति 10 ग्रॅम 1,360 रुपयांनी कमी होऊन 1,00,970 रुपये झाली आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति 10 ग्रॅम 1,250 रुपयांनी कमी होऊन 92,550 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, 18 कॅरेट सोन्याची किंमत देखील (24 जुलै) प्रति 10 ग्रॅम 1,020 रुपयांनी कमी होऊन 75,730 रुपये झाली आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 10,097 रुपये आहे. सध्या हिंदुस्थानात 1 किलो चांदीची किरकोळ किंमत 1,18,000 रुपये आहे.