सोन्याची झळाळी ओसरली…जाणून घ्या आजचे दर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आतापर्यंत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. कोरोनाच्या संकटामुळे शेअर मार्केट आणि म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अनेकांनी सोन्यातील गुतंवणुकीला प्राधान्य दिले आहे. सोन्यातील गुंतवणूक हा सुरक्षित पर्याय असल्याने अनेकांनी यात गुतंवणूक केल्याने सोन्याची मागणी आणि दर वाढले होते. मात्र, आता शेअर्स मार्केटमध्ये वाढ झालेली दिसत असताना फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे भाव खाली आलेले दिसत आहेत. त्यामुळे सोन्याची झळाळी ओसरत असल्याचे दिसून आले.

बाजार सुरू झाल्यावर सोमवारी सकाळी सोन्याचे भाव गडगडले आहेत. ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,967 रुपयांवर शुक्रवारी संध्याकाळी बंद झाले. तर सोमवारी सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 48,910 रुपयांवर बंद आला. सोमवारी सकाळी सोन्याचा भाव 48,933 रुपये आणि किमान 48,858 रुपयांवर पोहोचला होता. सकाळी 10.30 वाजता सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 48,915 रुपये होता.

या वर्षाच्या सुरुवातीस, सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 39 हजार रुपये होते. ते आता 49,500 च्या पातळीवर गेले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये सध्या सोने 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020च्या पहिल्या सहामाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडची (ईटीएफ) 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात गुंतवणूकदार मालमत्तेत गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत, ज्यामुळे सोन्याचे ईटीएफचे आकर्षण वाढले आहे. यावर्षी 30 जून रोजी संपलेल्या सहामाहीत गोल्ड ईटीएफला 3,530 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील सोन्याची आयात 94 टक्क्यांनी 68.8 कोटी डॉलर किंवा 5,160 कोटी रुपयांवर आली आहे. कोरोनामुळे सोन्याची मागणी कमी झालेली असून, सोन्याची आयातीत घसरण झाली आहे.