
हिंदुस्थानी सराफ बाजारात सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. दसरा दोन दिवसांवर आला असताना भाव वाढल्याने सोने खरेदीच्या दिवशी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
वाढलेल्या दरांनुसार सोमवारी सोन्याचे भाव 24 कॅरेटसाठी 50391 रुपये प्रतितोळा झाले आहेत. तर चांदीचा दर 999 शुद्धतेसाठी 57 हजार 268 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. तर 23 कॅरेटसाठी सोन्याचा दर 50 हजार 189 रुपये प्रतितोळा झाला आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी हा दर 46158 रुपये इतका झाला आहे.
हा दर 24 कॅरेटसाठी 89 रुपये प्रतितोळा महागला आहे. तर 23 कॅरेटच्या सोन्यासाठी 88 रुपये वाढले आहेत. तेच 22 कॅरेटसाठी 81 रुपयांनी सोने महागले आहे. तर चांदीच्या दरात 930 रुपयांची वाढ झाली आहे.





























































